Jasprit Bumrah ICC Ranking : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) याने बुधवारी आयसीसी रँकिंगमध्ये अजून एकी मानाचा रोवला आहे. बुमराह हा आतापर्यंत टेस्ट गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज आहे. बुमराह यापूर्वी माजी स्पिनर गोलंदाज आर अश्विन सोबत 904 रेटिंग पॉइंट्सवर होता. परंतु आता त्याने आर अश्विनला देखील मागे सोडलं आहे. बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या. तो स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणारा देखील गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहने 2018 रोजी साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. सिडनीतील पाचव्या टेस्टमध्ये देखील बुमराह ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी बुमराहला फक्त तीन विकेट्सची गरज आहे. सध्या हा विक्रम हरभजन सिंहच्या नावावर आहे. हरभजनने 2000-01 च्या मालिकेत 32 विकेट्स घेतल्या होत्या तर बुमराहने चार सामन्यात 30 विकेट घेतल्या होत्या.
3 ते 7 जानेवारी दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी येथे पार पडणार आहे. टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या ज्यात उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श यांचा समावेश होता. यापूर्वी माजी गोलंदाज अनिल कुंबळे हे MCG मध्ये सर्वाधिक 15 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज होते. मात्र ट्रेव्हिस हेडला बाद केल्यावर बुमराहने MCG वर घेतलेल्या विकेट्सची संख्या 18 वर पोहोचली. तर याबाबत रविचंद्रन अश्विन आणि कपिल देव हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 14 विकेट्स घेतले आहेत.