मुंबई : मनोरा आमदार निवास कामाचा दर्जा बघता इमारतीत होणारे बदल आता आमदारांच्याच अंगलट येऊ लागले आहेत.
आज सकाळी मनोरा आमदार निवासस्थानातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या रुममधील सीलिंग कोसळल्याचे समजतेय.
पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार सतीश यांच्या मनोरा निवासमधील रुम नंबर ११२ मधील स्लॅबचा भाग कोसळलाय. आज सकाळी आमदार निवासात कक्षात आल्यावर घटना उघड झाली.
मागील आठवड्यात मनोरा आमदार निवासस्थान पुर्नबांधणी करण्याबाबत विचार असल्याचा सरकार वतीने सांगितले होते. तीस वर्ष ही पूर्ण न झालेली १५ मजल्याच्या इमारतीचं बांधकाम किती निकृष्ट दर्जांचं आहे हे या निमित्तानं स्पष्ट झालंय..