पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.   

सायली पाटील | Updated: Aug 31, 2024, 10:46 AM IST
पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'  title=
Shivsena thackeray party leader sanjay raut on pm narendra modi apologies over chhatrapati shivaji maharaj statue collapse

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : कोकणातील सिंधुदुर्ग (Konkan Sindhudurg) इथं असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं कोसळून झालेलं नुकसान आणि त्ययानंतच्या एकंदर वातावरणामुळं सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. परिस्थिती गंभीर वळणावर आलेली असतानाच नुकत्या पार पडलेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची जाहीर माफी मागितली. ज्यानंतर आता त्यांच्या या कृतीवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटताना दिसत आहेत. 

मालवणमध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि या काराणामुळं सबंध महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा उसळला. त्यामुळं माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावं लागेल याच भावनेनं मोदींनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय माफी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना दिली. 

'उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी अशीच भावना या माफीमागे असून, यामध्ये महाराज, महाराष्ट्राविषयीचं प्रेम, आत्मियता याचा प्रश्नच येत नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातील लोकांनी दिलेला दिसतो. म्हणूनच मोदींनी मागितलेली माफी राजकीय असून, या संकटातून सुटका करण्यासाछीचा प्रयत्न आहे', असं राऊत म्हणाले. 

हेसुद्धा वाचा : हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'

 

माफी मागून इथं हा प्रश्न सुटत नाही. किंबहुना महाराष्ट्रात महाराजांचा जो अपमान या झाला आहे तो, या सरकारकडून झाला आहे, मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकटं आहेत. मोदींनी माफी मागितली असली तरीही या सरकारला विरोध करण्याची मविआची भूमिका बदलणार नाही. इतकंच काय, तर याविरोधाच्या धर्तीवर राज्यात सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित असून, त्यात कोणताही बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

रविवारी 11 वाजता शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यासह मविआतील सर्व घटक एकत्र यऊन शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील, असं राऊतांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांना सदर घटचनेचं दुख असतं तर पाच वर्षांपूर्वी पुलवामात जेव्हा 40 जवानांची हत्या झाली तेव्हा त्यांनी माफी मागितली असती, काश्मिरी पंडितांवर होणारा अन्याय पाहता त्यांची माफी मागितली असती, महिला अत्याचारावर माफी मागितली असती, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधानांच्या भूमिकेवर निशाणा साधला. 

'प्रत्येक वेळी निव़डणूक डोळ्यापुढे पुढे ठेवत कृती करायची, पावलं टाकायची ही पंतप्रधानांची खासियत आहे. त्यामुळे छत्रपती शिवराजयंची मागितलेली माफी हा व्यक्तीगत आणि राजकीय विषय आहे. महाराष्ट्रानं तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल', अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही तोफ डागली.