त्यासाठी बंदुकीची गोळी कशाला? मोदींच्या हत्येच्या कटाविषयी आंबेडकरांची प्रतिक्रिया

उंदीर मारण्यासाठी टीक-ट्वेंन्टीची गरज आहे.

Updated: Sep 1, 2018, 07:27 PM IST

मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका केली. पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या डाव्या विचारवंतांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे सादर केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांचा हा दावा फेटाळून लावत हे पुरावे खोटे असल्याचे सांगितले. 

पोलिसांनी सादर केलेल्या पत्रव्यवहारात नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. याविषयी विचारले असता आंबेडकरांनी म्हटले की, उंदीर मारण्यासाठी टीक-ट्वेंन्टीची गरज आहे, बंदुकीच्या गोळीची नव्हे. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.