मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांना दिलेली मुदत शनिवारी मध्यरात्री संपुष्टात आली. मात्र, त्यानंतरही मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नियमानुसार कंत्राटदारांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी वाहतूक कोंडीही दिसते. या खड्ड्यांचा त्रास वाहनचालक आणि नागरिकांना सहन करावा लागतोय. मागील महिनाभरात रस्त्यांवर १ हजार ३२ खड्डे पडले होते. त्यापैकी 674 खड्डे बुजवण्यात आले असून अद्याप 358 खड्डे शिल्लक आहेत. हे खड्डे शुक्रवारी व शनिवारी बुजवण्यात यावे असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. खड्डे भरण्यासाठी पालिकेने यंदा स्वत: 297.99 टन कोल्डमिक्स तयार केले होते.