मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच ठणकावलं. 

Updated: Mar 25, 2022, 09:14 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग title=

मुंबई : Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच ठणकावलं. ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (,Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवदेनानंतर विरोधी पक्षाने विधानसभेतून सभात्याग केला.

ईडी आहे की घरगडी? कुटुंबीयांची बदनामी कशासाठी ? असा सवालही त्यांनी केलाय. सत्तेच्या प्रयोगावरून त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावला. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. तसेच विरोधकांच्या आरोपांना उत्तर न दिल्यामुळे भाजपने विधानसभेतून सभात्याग केला. 

सरकारचे वाभाडे काढले,परंतु सरकार याला उत्तर देवू शकले नाही.  महाविकास आघाडीचा कत्तलखाना सीडीच्या रूपाने समोर आणला. सरकार हादरले. आम्हाला सीआयडी मान्य नाही, म्हणून आम्ही हायकोर्टात गेलोय व सीबीआय चौकशी मागणी केली.  वीजतोडणी काही काळ बंद केलीय. शहाणपणं उशिरा आले. एनए टॅक्स रद्द करावा लागला सरकारला, असे फडणवीस म्हणाले. 

 विदर्भ,मराठवाडा वॉटर ग्रीडबाबत हे सुरूय. या भागात केवळ तरतुदी दाखवतात पण खर्च करत नाही.  नविन मोठे निर्णय घेतले नाहीत.  सीएमनी दोन भाषण केली. आजचे भाषण शिवाजी पार्कवरचे होते. मुद्यांवर काहीच बोलले नाहीत. नवाब मलिकांचा ते समर्थन करतायत. काय लाचारी आली शिवसेनेवर. चेहरा उघड झाला ते बरे झाले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलंय. ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. ईडी आहे की घरगडी? कुटुंबीयांची बदनामी कशासाठी ? असा सवालही त्यांनी केलाय. सत्तेच्या प्रयोगावरून त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावला. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याची प्रगती विरोधकांना दिसत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील आकडेवारीचा संदर्भ देत राज्यात सर्वांत कमी मद्याची दुकाने असल्याचा दावा त्यांनी केला.