प्रविण दरेकरांना मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टने फेटाळला आहे. मुंबई सेशन कोर्टाने दरेकरांना अर्ज फेटाळून लावला आहे. 

Updated: Mar 25, 2022, 05:30 PM IST
प्रविण दरेकरांना मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला title=

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टने फेटाळला आहे. मुंबई सेशन कोर्टाने दरेकरांना अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी उच्च न्यायालयाने ही मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची प्रविण दरेकरांची मागणी फेटाळली होती.

मुंबई उच्च न्यायालयात अपील करायचे आहे आणि तो निकाल येईपर्यंत अटके पासून सरंक्षण द्यावे अशी मागणी प्रविण दरेकर यांच्या वकिलांनी केली आहे. 2 आठवडे अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. दरम्यानच्या काळात हायकोर्टात अपील करायचे आह. म्हणून दिलासा मिळावा ही विनंती वकिलांनी केली आहे. 2 दिवस अटकेपासून दिलासा मिळाला यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे यांच्या तक्रारीनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. शिंदे यांनी दरेकर यांच्यावर ट्रेड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून मुंबई बँकेत संचालकपद मिळवल्याचा आरोप केला होता.

2011 ते 2021 या कालावधीत मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेले दरेकर (Pravin Darekar) यांनी स्वत:ची मजूर म्हणून ओळख करून दिली, जी नंतर खोटी असल्याचे निष्पन्न झाले, असा आरोपही त्यांनी केला.

सहकार विभागाने या वर्षी ३ जानेवारी रोजी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेच्या सभासद म्हणून अपात्र ठरवले. 1997 मध्ये प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सभासद झालेले दरेकर आजपर्यंत मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत. राजकीय द्वेषातून आपल्यावर कारवाई होत असल्याचा दरेकर यांचा दावा आहे.