दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण

निर्बंधमुक्तीची गुढी... डोंबिवली, ठाणे, गिरगाव याठिकाणी ढोल पथकांकडून सलामी वादन सुरू  

Updated: Apr 2, 2022, 09:46 AM IST
दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण title=

मुंबई : कोरोना महामारीनंतर अखेर दोन वर्षांनंतर गुढीपाडवा मोठ्या उत्साह सगळीकडे साजरा होत आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा सुरू झाली आहे. रस्त्यांवर प्रत्येक जण नुतन वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. डोंबिवली, ठाणे, गिरगाव याठिकाणी पुरूष, महिला सजून-धजून तयार होवून सणाचा आनंद घेत आहे. दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत केलं जातंय.

डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रा वक्रतुंड ढोल पथक कडून सलामी वादन सुरू झालं आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षांनंतर डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंद आणि उत्साहाची लाट आली आहे. 

गिरगावात आज निर्बंधमुक्तीची गुढी उभारली जाणार आहे. रस्त्यांवर रांगोळ्या काढून आणि गुढी उभारून गिरगावमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. 

ठाण्यात नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी पाहायला मिळत आह . नव वर्ष स्वागतयात्रे आधीची तयारी पूर्ण झाली आहे. कोपीनेश्वर मंदिरापासून  शोभायात्रा सुरु होणार आहे. 2 वर्षानंतर आज ठाणेकर जल्लोषात नव्या वर्षाचं स्वगत करत आहेत.