मराठा क्रांती मोर्चा मुंबई : आतापर्यंतच्या १० ठळक घडामोडी

मोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व हायवेवरील टोल बंद करण्यात आला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 9, 2017, 10:26 AM IST
मराठा क्रांती मोर्चा मुंबई : आतापर्यंतच्या १० ठळक घडामोडी title=

मुंबई : गेले अनेक दिवस राज्यभर घोंगावत असलेले मराठा मोर्चाचे वादळ आज (बुधवार) राजधानी मुंबईत धडकत आहे. मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईकडे निघाले असून, काही मुंबईत पोहोचलेही आहेत. मुंबईतील रस्ते गर्दीने भरून गेले आहेत. सर्वत्र ‘एक मराठा एक लाख मराठा’ असे लिहीलेल्या टोप्या आणि अंगात शिवाजी महाराजांचे चित्र असलेले टीशर्ट घातलेले लोक दिसत आहेत. अशा या अभूतपूर्व मोर्चाबाबत आतापर्यंतच्या काही ठळक घडामोडी आमच्या वाचकांसाठी

यंत्रणा सुसज्ज : मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह राज्यातील सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहे. या यंत्रणांनी कायदासुव्यवस्थेचा तसेच सार्वजनीक सेवेवर या मोर्चाचा अधिक ताण पडून नये यासाठी चोख व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. चौकाचौकात पोलीस यंत्रणा, आरोग्यसुवीधा उभारण्यात आली आहे.

हायवेवर टोलवसुली बंद : मोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व हायवेवरील टोल बंद करण्यात आला आहे. माराठा मोर्चासाठी येत असलेल्या वाहनांची संख्या पाहता टोलनाक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने मुंबईकडे येणाऱ्या नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका इथली टोलवसूली बंद आहे.

छत्रपतींच्या वेशात आंदोलक : मोर्चादरम्यान एक गोष्ट निदर्शनास येत आहे की, अनेक आंदोलक हटके स्टाईलने मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यापैकी काही तरूण शिवाजी महाराजांच्या वेशात सहभागी झाले आहेत. तर, काही तरूणी पारंपरीक वेषात सहभागी झाल्या आहेत. मुंबईतील आझाद मैदानात शिवाजी महाराजांच्या वेशात मराठा आंदोलक सहभागी.

ठाण्यात वाहतूक कोंडी : मोर्चासाठी अनेक आंदोलक मुंबईकडे येत असल्यामुळे पूर्व द्रूतगती मार्गावर वाहतुकीची प्रंचड कोंडी झाली आहे. आनंदनगर जकातनाक्यापासून मुंबईकडे येणारी वाहतूक अत्यंत धीम्यागतीने, तीनहात नाका, कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळंबली. हा वाहने पूढे काढण्याचा प्रचंड प्रयत्न होत आहे. मात्र, त्याला इतक्यात यश येईल असे दिसत नाही.

राज्यभरातून आदोलक मुंबईत : आतापर्यंतच्या मोर्चाला असलेली प्रचंड गर्दी विचारात घेता काही लोक कालच (मंगळवार) मुंबईत दाखल झाले आहेत. तर काहींनी मध्यरात्रीच मुंबईकडे कूच केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त मोर्चेकरी सहभागी होणार असल्याचा अंदाज मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनाही मोर्चात सहभागी :  मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाला शिवसेनेनेही पाठींबा दिला असून, मराठा क्रांती मोर्चात शिवेसेनेचे मंत्री आणि आमदार सहभागी होणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. या आधीही जिल्हा पातळीवर तसेच, स्थानिक पातळीवर झालेल्या मोर्चात शिवेसनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर ताण : राज्यभरातून मुंबईकडे येणारे लोंढे वाढतच असून, मुंबईची नस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेवर गर्दीचा प्रचंड ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  लोकलमधून प्रवास करताना मराठा मोर्चेकरी घोषणा देताना दिसत आहेत.