राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! ठाकरे गटातील मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार?

शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत हा खासदार नेता शिंदे गटात जाणार?

Updated: Nov 11, 2022, 07:27 PM IST
राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! ठाकरे गटातील मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार? title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. ठाकरे गटातील  (Thackeray Group) मोठे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. किर्तीकर आजच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत आधीपासूनच चर्चा रंगली होती. शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीबरोबर (NCP) युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्ला किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) यांना दिला होता. याआधी 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, असं सांगण्यात आलं होतं.

त्याआधी सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचं म्हटलं होतं. किर्तीकर आजारी असल्याने त्यांची भेट घेतल्याचं बोललं गेलं. पण आता किर्तिकर स्वत: वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यास गेल्यानं चर्चांणा पुन्हा एकदा उधाण आलं आहे.