Latest Political News in Marathi : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात शिवसैनिकांनी लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात सुरु झाला आहे. तेजस उद्धव ठाकरे (Tejas Thackeray) यांचे पोस्टर झळकले आहे. शिवसैनिकांना असलेली प्रतीक्षा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेची या बॅनरमधून दिसत आहे.
तेजस ठाकरे (Tejas Thackeray) मुंबई महापालिका निवडणुकीत उतरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारण ठरलंय ते मुंबईत लागलेली पोस्टर्स. (Maharashtra Political News) गिरगावात शिवसैनिकांनी तेजस ठाकरे यांचे पोस्टर लावले आहे. आजची शांतता.... उद्याचे वादळ...नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावलेत. शिवसैनिकांना असलेली प्रतीक्षा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेची या बॅनरमधून दिसत आहे.
राज्यात गेल्या (Maharashtra Politics) काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषांचा अपमान होईल, अशी विधानं केली जात आहे. या विरोधात आणि निषेधार्थ महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व पक्षीयांचा हल्लाबोल मोर्चा काढला होता. या महामोर्च्यात मविआतील अनेक दिग्गज नेते सहभागी झाले. मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे. (Tejas Thackeray) तेजस या मोर्च्यात सहभागी झाल्याने तो सर्वांच्यात चर्चेचा विषय ठरला. (Tejas Thackeray In Mva Protest Rally) आता पुन्हा त्यांची मुंबईत पोस्टर्स लागल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीच्या मोर्च्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. यामध्ये मुलगा तेजस आणि पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा होत्या. अशा प्रकारच्या जाहीर मोर्चात रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि तेजस ठाकरे सहभागी झाले. याआधी अनेकदा तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होते. आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर तेजसला युवासेनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं अजूनही झालेले नाही.