दीपक भातुसे / मुंबई : विधान परिषेदेत राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या १२ जागांबाबत प्रस्ताव आणला जाणार आहे. १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिनही पक्ष प्रत्येकी चार नावं देणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध महाविकासआघाडी सरकार असा संघर्षामुळे राज्यपाल या नावांना परवानगी देणार का याकडे लक्ष लागलेलं असेल.
शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, वरूण सरदेसाई, राहुल कनाल, नितीन बानगुडे पाटील, अर्जुन खोतकर, विजय आप्पा करंजकर यांना संधी दिली जाऊ शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, उत्तमराव जानकर यांना संधी मिळू शकते. काँग्रेस पक्षाकडून सचिन सावंत, मोहन जोशी, सत्यजित तांबे, रजनी पाटील, नसीम खान, मुझफर हुसेन यांची नावं पुढे येऊ शकतात.