'महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा'

कमला मिलमध्ये आग लागल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Updated: Dec 29, 2017, 04:46 PM IST
'महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा' title=

मुंबई : कमला मिलमध्ये आग लागल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा-सोमय्या

काही दिवसांपूर्वी फरसाण मार्टच्या आगीतही मोठी जिवित हानी झाली, आजही पबच्या आगीत 14 लोकांची जीव गेला आहे, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

वेगळा देश असल्यासारखी व्यवस्था- सावंत

खासदार अरविंद सावंत यांनी देखील, फायर सेफ्टी ऑडीटमध्ये दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं आहे. मिलमध्ये अशी बेकायदेशीर हॉटेल्स उभारून, स्वत:चा देश असल्यासारखी ही मंडळी वागते, कायदे मोडून असं कोणतंही काम करता येणार नाही, हे थांबलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, वर्षाच्या शेवटी आणि सुरूवातीला ही हादरवणारी घटना असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.