डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचे भाजप समोर आव्हान

डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.  

Updated: Oct 1, 2019, 10:04 PM IST
डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचे भाजप समोर आव्हान title=
संग्रहित छाया

मुंबई : डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपने नव्या दमाच्या कॉ. विनोद निकोले यांना उमेदवारी देऊन भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. कम्युनिस्टांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत कॉ. विनोद निकोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. 

माकपचा बालेकिल्ला राहिलेल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये माकपमधील कुरघोडीमुळे भाजपने सुरुंग लावत भाजपचा झेंडा फडकवला होता. तर यंदा युतीचे उमेदवार विद्यमान भाजपचे आमदार पास्कल धणारे यांना डहाणू विधानसभेत पुन्हा मिळली आहे.