मुंबई : चार राज्यात पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपनं मिशन मुंबई (BJP Mission Mumbai) हाती घेतलंय. मुंबई-महाराष्ट्रासाठी भाजपनं खास प्लॅन हाती घेतलाय. भाजपचं नक्की मिशन मुंबई काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (bjp mission mumbai over to upcoming bmc election devendra fadanvis)
पाहिलंत, देवेंद्र फडणवीस काय सांगतायेत. हेच आहे भाजपचं पुढचं मिशन. गोव्यात भाजपला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलंय.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. गोव्याचे निकाल लागल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतही भाष्य केलं होतं. 2024 मध्ये राज्यात बहुमतानं भाजपची सत्ता येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. तर शिवसेनेनंही भाजपच्या मिशन मुंबईला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई महापालिकेत सलग 26 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेला अद्याप कुणीच आव्हान देऊ शकलेलं नाही. मात्र विजयी घोडदौडीनंतर भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे शिवसेनेला यंदाची निवडणूक नक्कीच सोपी नाही.