आदित्य ठाकरे यांचं वरळीकरांना पत्र, '3 वर्षात वरळीची हेवा वाटण्यासारखी प्रगती'

ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा राडा, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा शिंदे गटाला पुन्हा टोला

Updated: Nov 21, 2022, 03:22 PM IST
आदित्य ठाकरे यांचं वरळीकरांना पत्र, '3 वर्षात वरळीची हेवा वाटण्यासारखी प्रगती' title=

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वरळीतल्या (Worli) नागरिकांना उद्देशून एक पत्र (Letter) लिहिलंय. गेल्या 3 वर्षात वरळीत दुसऱ्यांना हेवा वाटावा अशी प्रगती झाली. त्यामुळे आता इतर पक्षांनाही वरळीत वेळ आणि पैसा खर्च करावासा वाटतो असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावलाय.

ठाकरे गट - शिंदे गट आमने सामने
दरम्यान, प्रभादेवीमध्ये (Prabhadevi) शिंदे आणि ठाकरे गट (Shinde Group vs Thackeray Group) पुन्हा एकदा आमने-सामने आलेयत...शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) आणि ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींमध्ये (Ajay Choudhari) कामांवरून श्रेयवादावरून वाद झाला...प्रभादेवी भागात फुटपाथच्या नूतनीकरणाचं काम पंधरा दिवसांत पूर्ण होणार होतं...पण, त्याआधीच समाधान सरवणकर यांनी उद्घाटन केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने विरोध केला...यावेळी घोषणाबाजी करण्यात आली...या कामाचा पाठपुरावा ठाकरे गटाने केल्याचा दावा आमदार अजय चौधरी यांनी केलाय.