Internet Blackout 2025:16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद पडणार? 'द सिम्पसंस'ची भविष्यवाणी खरी ठरणार?

16 जानेवारी रोजी जगभरात इंटरनेट ठप्प पडणार आहे.  'द सिम्पसंस'ची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 15, 2025, 11:07 PM IST
Internet Blackout 2025:16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद पडणार? 'द सिम्पसंस'ची भविष्यवाणी खरी ठरणार?  title=

Simpsons Prediction Global Internet outage: सोशल मिडियावर सध्या एक पोस्ट तपउान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 16 जानेवारी 2025रोजी जगभरात इंटरनेट बंद पडणार असल्याचे बोलले जात आहे. कार्टून शो 'द सिम्पसंस' याबाबतची भविष्यवाणी केली होती. खरचं जगभरात इंटरनेट बंद पडणार का? 'द सिम्पसंस' की भविष्यवाणी खरी ठरणार का? सोशल मिडियावर याची तुफान चर्चा होत आहे.

16 जानेवारी 2025 रोजी जगभरात इंटरनेट सर्व्हर डाऊन होणार असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफना व्हायरल होत आहे. 16 जानेवारीला जगभरातील इंटरनेट सर्व्हर डाउन होईल असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प 16 जानेवारीला शपथ घेत आहेत आणि इंटरनेट सर्व्हर डाऊन होत आहे असं या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची शपत घेत असतानाच शार्क मासे समुद्राखालील इंटरनेटची वायरल दाताने तोडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. कार्टून शो 'द सिम्पसंस' ने व्हिडिओच्या माध्यमातून 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद पडणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.  हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 'द सिम्पसंस'ची भविष्यवाणी खरी ठरली आणि जग भरात इंटरनेट बंद पडले तर सर्वांनाच याचा फटका बसेल. बँंकिग, ट्रेडिंग, ऑनलाईन, शॉपिंग, तिकीट बुकींग तसेच इंटरनेटशी संबधीत सर्व कामे ठप्प होतील. अप्रत्यक्षपणे जगाच्या अर्थव्यवस्थेलाचा याचा मोठा फटका बसेल. संपूर्ण जगच ठप्प होईल. 

 

'द सिम्पसंस' या कार्टनूने आजपर्यंत अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. शोचे लेखक अल्फ्रेड अर्नेस्ट जीन यांनी रेडिओ 1 न्यूजबीटला सांगितले होते की 2000 मध्ये ट्रम्प  अध्यक्ष होऊ शकतात.  अशा अनेक भविष्यवाण्या  व्हायरल झाल्या आहेत. 

टीप - इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची zee 24 तास पुष्टी करत नाही.