Sukesh Chandrashekhar : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश चंद्रशेखर भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा गुन्हेगार ठरला आहे. सुकेश चंद्रशेखर याने जेलमध्ये बसून 22,41,00,00,000 एवढा पैसा कमावला आहे. खुद्द सुकेश चंद्रशेखर यानेच त्याच्या कमाईचा आकडा जाहीर केला आहे. सट्टेबाजीचा धंदा करणारा सुकेश चंद्रशेखर तुरुंग कर्मचाऱ्यांना दरमहा दीड कोटींची लाच देत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.
आरोपी सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे. यात त्याने आपल्याला कमाईवर टॅक्स 7640 कोटी रुपयांचा टॅक्स भरायचा असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या पत्रात त्याने त्याचा कमाईचा तपशील नमूद केला आहे.
एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन, ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग आणि बेटिंगमध्ये सुकेश चंद्रशेखर याने पैसे गुंतले आहेत. नेवाडा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये सुकेश चंद्रशेखर याचे नोंदणीकृत परदेशी व्यवसाय आहेत. अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्येही सुकेश चंद्रशेखर याचा व्यवसाय विस्तारलेला आहे. या सर्व व्यवसाच्या माध्यमातून 22,410 कोटी रुपये कमावले आहेत.
सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पाठवलेल्या पत्रात उत्पन्नाचा सर्व तपशील नमूद केला आहे. तसेच या उत्पानुसार भारत सरकारला मला 7640 कोटी रुपयांचा टॅक्स भरायचा असल्याचे या पत्रात नमुद केले आहे.
सुकेशचे पत्र व्हायरल
200कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीवर गंभीर आरोप केलेत. नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर सुकेशनं पत्र लिहिलंयं.. जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती असं या पत्रात त्यानं नमूद केलंय. मात्र जॅकलिनला सोडण्यास नकार दिल्यानं नोरा आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप सुकेशनं केलाय.