16 जानेवारीला अभिनेता सैफ अली खान याच्यावर चोराने चाकूहल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी सकाळी 5 वाजता आरोपी शहजादला हल्ल्याचं रिक्रिशन करण्यासाठी मुंबई पोलीस सैफ अली खानच्या घरी घेऊन गेले.
आरोपी मोहम्मदला घेऊन मुंबई पोलीस काल रात्री उशिरा सैफ अली खानच्या घरी आले होते. आरोपी सैफच्या घरी कसा घुसला यांची इंतभुत माहिती पोलिसांनी आरोपीकडून काढून घेतली. सैफच्या घरी आरोपी पाय-यावरून जाताना सीसीटीव्हीत चित्रित झालं मात्र घरापर्यंत आरोपी कसा पोहचला ते जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी नेलं होतं, दरम्यान रिक्रिएशनंतर आरोपी मोहम्मद शहजादला पुन्हा वांद्रे पोलीस ठाण्यात आणल आहे.
रिक्रिएशन करताना पोलिसांनी आरोपीला वांद्रे स्टेशन ते सैफ अली खानच्या इमारतीपर्यंत कसा पोहोचला हे सुरुवातीला करायला सांगितलं. त्यांनंतर 11 मजल्यावरुन तो सैफच्या घरी म्हणजेच 12 व्या मजल्यावर कसा पोहोचला. कारण हा चोर सीसीटीव्हीमध्ये दिसत नाही. तर रिक्रिएशनमध्ये आरोपी मोहम्मदने शहजादने आपण एसी डकमधून प्रवेश केल्याचं सांगितलं. एसी डकमधून मोहम्मद शहजाद सैफच्या घरी पोहोचला. 12 ते 14 माळ्यावर त्याने याचपद्धतीने घुसला.
सैफच्या घरी इलेक्ट्रिक लॉक आहे मग चोर आतमध्ये कसा गेला? असा देखील सवाल विचारला जात होता. यावेळी रिक्रिशनदरम्यान आरोपीने एसी डकच्या माध्यमातून तो आत गेल्याच उघड केलं. तसेच त्यानंतर तो नॅशनल कॉलोज ते वांद्रे बस थांबा येथील देखे आरोपी थांबल्याचं यावेळी आरोपीने सांगितलं.
16 जानेवारी रोजी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने आरोपी मोहम्मद शहजाद घरात घुसला. चोरीच्या उद्देशाने आणि जेहला आोलीस धरण्याच्या उद्देशाने चोर घरात घुसला होता. कुटुंबाचा बचाव करताना हल्ल्यात हल्लेखोराने सैफ अली खानवर 6 वार केले होते. यामधील 2 वार इतके गंभीर हो ते की, सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.