महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान 29 जानेवारी रोजी सुरु झाला आहे. तसेच महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. संगमच्या काठावर, नागा साधूंच्या 13 आखाड्यांनी आपले तळ उभारले असून ते परमेश्वराच्या भक्तीत मग्न आहेत. अमृत स्नानाच्या दिवशी हे नागा साधू सर्वात आधी स्नान करतात. हिंदू धर्मात महाकुंभाचे एक वेगळे महत्त्व आहे. कारण ते 12 वर्षांनी येते. शिवाय, महाकुंभ देशात फक्त 4 ठिकाणी आयोजित केला जातो ज्यामध्ये उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि प्रयागराज यांचा समावेश आहे.
नागा साधूंचे पहिले स्नान हे धर्म आणि आध्यात्मिक उर्जेचे केंद्र मानले जाते. अमृत स्नानात, सर्वप्रथम 13 आखाड्यांमधील नाग, संत, आचार्य, महामंडलेश्वर, महिला नागा साधू स्नान करतात. यानंतर भक्तांची पाळी येते. कुंभमेळ्याच्या परंपरेनुसार, अमृत स्नान फक्त विशिष्ट तारखांनाच होते. देशभरातील साधू आणि संत या महाकुंभात येतात आणि पवित्र नदीत स्नान करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, महाकुंभात अमृत स्नान केल्याने मोक्ष मिळतो आणि शरीर आणि मनातील अशुद्धता दूर होतात.
शास्त्रांनुसार, महाकुंभ हे ऋषी आणि भिक्षूंसाठी खूप महत्वाचे स्नान मानले जाते. असे मानले जाते की, फक्त अमृत स्नान केल्याने 1000 अश्वमेध यज्ञांचे पुण्य मिळते. महाकुंभात अमृत स्नान केल्यानंतर, ऋषी आणि संत प्रभूचे ध्यान करतात. हेच कारण आहे की, संत आणि ऋषी निश्चितच विश्व कल्याणासाठी आणि स्वतःच्या मुक्तीसाठी महाकुंभात जातात.
महाकुंभातील पहिले अमृत स्नान 14 जानेवारी रोजी पूर्ण झाले आहे, आता दुसऱ्या अमृत स्नानाची पाळी आहे जी 29 जानेवारी रोजी होणार आहे. यानंतर, तिसरे अमृत स्नान 3 फेब्रुवारी रोजी होईल. यानंतर, माघी पौर्णिमेला स्नान 12 फेब्रुवारी आणि महाशिवरात्रीला २६ फेब्रुवारी होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)