'लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा...', सैफ-करिनाचा 'तो' फोटो पाहून शत्रुघ्न सिन्हांवर भडकले चाहते

Saif Ali Khan Attacked Shatrughan Sinha Post: अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल असतानाच ही पोस्ट केल्याने ज्येष्ठ अभिनेते ट्रोल झाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 21, 2025, 01:25 PM IST
'लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा...', सैफ-करिनाचा 'तो' फोटो पाहून शत्रुघ्न सिन्हांवर भडकले चाहते title=
त्या फोटोंमुळे सिन्हा ट्रोल झालेत (प्रातिनिधिक फोटो)

Saif Ali Khan Attacked Shatrughan Sinha Post: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि राजकीय पटलावर सध्या सक्रीय असलेले शत्रुघ्न सिन्हा सोशल मीडियावर सध्या ट्रोल होत आहेत. विशेष म्हणजे या ट्रेलिंगसाठी त्यांनी सध्या चर्चेत असलेला अभिनेता सैफ अली खान याचा पोस्ट केलेला फोटो कारणीभूत आहे. शत्रुघ्न सिन्हांनी पोस्ट केलेल्या या फोटोवरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर त्यांनी हा फोटो डिलिट केला असता तरी तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...

पोस्टमध्ये होतं काय?

सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरात हल्ला झाला. या प्राणघातक हल्ल्यातून सैफ थोडक्यात बचावला असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये मागील पाच दिवसांपासून उपचार सुरु आहेत. सैफला लवकर बरं वाटावं यासाठी अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी सुद्धा आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन सैफला रिकव्हरीसाठी शुभेच्छा. मात्र त्यांनी या पोस्टमध्ये एआयने तयार करण्यात आलेला सैफ आणि करिनाचा एक फोटोही पोस्ट केलेला. या फोटोत सैफच्या उजव्या हाताला साइन लावण्यात आलं असून तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला असून त्याची पत्नी करिना त्याच्या बाजूला बसल्याचं दिसत आहे. दोघेही कॅमेराकडून पाहून स्मितहास्य करताना दिसत आहेत. हा फोटो एआय जनरेटेड असल्याचं समजत होता.

पोस्टमध्ये काय म्हटलेलं?

रविवारी सकाळी शत्रुघ्न सिन्हा यांनी सैफ आणि करिनाचा हा फोटो शेअर केला होता. "आमचा निकटवर्तीय, लाडका आणि सर्वांना आवडणाऱ्या सैफ अली खानवर झालेला हल्ला फारच दुखद आणि दुर्देवी असा आहे. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. देवाचे आभार मनातो की तो सुरक्षित आहे. कायमच माझे आवडते राहिलेले 'शो मन' राज कपूर यांची नात करिना खान आणि त्यांच्या कुटुंबाला यामधून सावरण्यासाठी शुभेच्छा," अशी कॅप्शन शत्रुघ्न सिन्हा यांनी या फोटोला दिली होती. 

नक्की वाचा >> करिनाच्या 'त्या' चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आलं! पोलिसांचा दावा; म्हणाले, 'हल्ल्यानंतर तिने फोन...'

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख

"एक नम्र विनंती आहे की एकमेकांना दोष देण्याचा खेळ बंद करा. पोलीस त्यांचं काम करत आहेत. आम्ही नक्कीच आमचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या चिंतेंबद्दल त्याचे आभार मानतो. हे प्रकरण अधिक चिघळू नये असे प्रयत्न करूयात. हे प्रकरण लवकरात लवकर सोडवलं जाणं फायद्याचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे मित्र एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भावना, त्यांना वाटणारी चिंता त्यांनी व्यक्त केली तसेच ते या प्रकरणात करत असलेल्या कारवाईसाठी आभारी आहोत. सैफ हा सर्वात उत्तम कलाकारांपैकी एक आहे. तसेच तो पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार आहे. गोष्टी योग्य मार्गाने पुढे जातील आणि कायदा त्याचं काम करेल," असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'

फॉलोअर्स म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे...'

अनेकांनी या पोस्टमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी एआय फोटो वापरण्याची गरज नव्हती असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे. तर काहींनी सैफ आणि करिनाचा हसणारा फोटो या अशा गंभीर प्रसंगी शेअर केल्यावरुन, "लाज वाटली पाहिजे. तुम्ही अशा गंभीर प्रसंगी तुम्ही असा फोटो शेअर करताय," असं म्हटलं होतं. अखेर या पोस्टमधून शत्रुघ्न सिन्हा यांनी तो एआय जनरेटेड फोटो हटवला आहे.