अमिताभ बच्चन यांना 4 वर्षांत झाला 52 कोटींचा नफा, फक्त केलं 'हे' एक काम

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींनी मुंबईतील ओशिवरा भागातील डुप्लेक्स अपार्टमेंट विकले असून, त्यावर त्यांना मोठा नफा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले आहे.  

Intern | Updated: Jan 21, 2025, 03:01 PM IST
अमिताभ बच्चन यांना 4 वर्षांत झाला 52 कोटींचा नफा, फक्त केलं 'हे' एक काम title=

Amitabh Bachchan Sells Apartment: मुंबईतील ओशिवरा येथील हे डुप्लेक्स अपार्टमेंट अमिताभ बच्चन यांनी एप्रिल 2021 मध्ये 31 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता तेच अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्या मालमत्तेमध्ये मोठा बदल झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंटमधून 52 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

क्रिती सेनन या घरात भाड्याने राहत होती
या अपार्टमेंटमध्ये अमिताभ बच्चन यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये अभिनेत्री क्रिती सेननला भाड्याने दिले होते. क्रिती सेनन दर महिन्याला 10 लाख रुपये भाडे आणि 60 लाख रुपयांची सुरक्षा ठेव दिली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अटलांटिस क्रिस्टल ग्रुपच्या डुप्लेक्स अपार्टमेंटचे वैशिष्ट्ये
हे अपार्टमेंट अटलांटिस क्रिस्टल ग्रुपने विकसित केले आहे. हे अपार्टमेंट 1.55 एकर क्षेत्रात बांधले गेले आहे. येथे 4, 5 आणि 6 BHK फ्लॅट्स आहेत. या डुप्लेक्स अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 5,704 चौरस फूट आहे, तर कार्पेट क्षेत्रफळ 5,185.62 चौरस फूट आहे. याशिवाय अपार्टमेंटमध्ये एक सुंदर टेरेस आणि 6 गाड्यांसाठी पार्किंगची सोय आहे.

हे ही वाचा: मिथुन चक्रवर्तीने शक्ती कपूरला दिलेली कठोर शिक्षा; शक्ती कपूरला रडत रडत मागावी लागेली माफी

रिअल इस्टेटमध्ये अमिताभ बच्चन यांची मोठी गुंतवणूक

अमिताभ बच्चन यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, त्यांनी मुलुंड पश्चिममध्ये 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. 2024 मध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याशिवाय अनेक बॉलिवूड स्टार्सही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यामध्ये अजय देवगण, शाहिद कपूर आणि इतर प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे.