Guardian Minister NCP Unhappy: शिवसेनेनंतर आता पालकमंत्रिपद वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आधीच शिवसेनेच्या हक्काचे नाशिक आणि रायगडसारखे जिल्हे भारतीय जनता पार्टीला गेल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने नाराजी व्यक्त केल्याने या दोन जिल्ह्यांमधील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. असं असतानाच आता राष्ट्रवादीमध्येही पालकमंत्रिपदावरील नियुक्त्यांवरुन नाराजी दिसून येत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरील जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवारांनी स्वत: पुरते आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले. मात्र पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना स्वजिल्हे देण्याचे प्रमाण सर्वात कमी असल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालं असून इतर सर्वांना बाहेरच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले गेले आहे.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 पैकी केवळ एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वजिल्हा मिळाला आहे. तर आदिती तटकरेंना स्वजिल्हा मिळाला होता. त्यावर आता स्थगिती आली आहे.
नक्की वाचा >> पालकमंत्री नक्की काय काम करतात? त्यांना काय अधिकार असतात? हे पद इतकं महत्त्वाचं का?
1) कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना 625 किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.
2) नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना पालकमंत्री म्हणून 195 किमीवरचा नंदूरबार जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे.
3) साता-याचे मकरंद पाटील यांना 440 किमी दूरच्या बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे.
4) नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना 445 किमीवरचा हिंगोली जिल्हा पालकमंत्री म्हणून देण्यात आला आहे.
5) लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना 636 किमीवरील गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणून सोपवण्यात आला आहे.
नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List
भाजप
1) चंद्रशेखर बावनकुळे -नागपूर
2) राधाकृष्ण विखे पाटील-अहिल्यानगर
3) निलेश राणे-सिंधुदूर्ग
4) पंकज भोयर-वर्धा
5) मेघना बोर्डीकर-परभणी
6) आशिष शेलार-मुंबई उपनगर
7) जयकुमार रावल-धुळे
शिवसेना
1) एकनाथ शिंदे-ठाणे
2) उदय सामंत-रत्नागिरी
3) संजय शिरसाठ-संभाजीनगर
4) गुलाबराव पाटील-जळगाव
5) संजय राठोड-यवतमाळ
6) शंभुराज देसाई-सातारा
7) प्रकाश आबिटकर-कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेस
1) अजित पवार-पुणे