Pune Crime News: जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून (Love Affair) प्रेयसीने प्रियकराचा (Girlfriend Boyfriend) खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Girlfriend Killed Boyfriend In Pune)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही मागील काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या शरिरावर वार केल्याचे दिसून आले. प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रेयसीही यामध्ये जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लातुरमध्ये खळबळ! तलावाशेजारी सापडला मानवी सांगाडा; ४ महिन्यांपूर्वीच्या 'त्या' घटनेशी संबंध?
दरम्यान, तरुणीने प्रियकराची हत्या का केली हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून याघटनेत प्रेयसीही गंभीर जखमी झाल्याने तिच्यावरही उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. एप्रिल महिन्यात राज्यात एकूण ३, ७२६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्यात एकूण ८ हजार ३१६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, मागील वर्षात एकूण १८, ०९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत अशा दोन ते तीन घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोपड्यांची पोलिसांत नोंद होण आवश्यक आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच, भाडेकरु जोडप्यांना घर देत असताना त्यांच्याकडून कागदपत्रे घेतात का?, अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे का?, असे सवाल उपस्थित होत आहेत.
भंडारा शहरातील गांधी चौकात दुर्गा लसी नावाने व्यवसाय करणाऱ्या अमन नांदुरकर वय 23 वर्ष या युवकांच्या पोटावर चाकू भोकसून हत्या करण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास गांधी चौकात की घटना घडली आहे.
नाशिकः संपूर्ण शरीर फ्रॅक्चर, खेळताना पिठाच्या गिरणीत पडला, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
हत्येच्या गुन्ह्यात अटक आरोपीने कोरोना काळात सुटल्यानंतर त्याने बाहेर येऊन पुन्हा एकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत असं या सिरीयल किलरचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच या आरोपीने एका मांत्रिकाची दोन हजार रुपयांसाठी दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.