TET Exam : राज्यभरातील भावी शिक्षकांना निकालाची प्रतीक्षा

 Teacher Eligibility Test : राज्यभरातील शिक्षक भरती परीक्षेसंदर्भातील (TET Exam) महत्वाची बामती. TET 2021 परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा आहे.  

Updated: Feb 17, 2022, 09:13 AM IST
TET Exam : राज्यभरातील भावी शिक्षकांना निकालाची प्रतीक्षा title=

पुणे : Teacher Eligibility Test : राज्यभरातील शिक्षक भरती परीक्षेसंदर्भातील (TET Exam) महत्वाची बामती. TET 2021 परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, परीक्षा घोटाळ्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांनी टीईटी निकालाची तारीख जाहीर करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. (TET Exam Scam: Future teachers in Maharashtra await results)

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा ( Teacher Eligibility Test Exam) नोव्हेंबर 2021मध्ये कोरोना काळात पार पडल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे होता. भरती घोटाळ्यातील प्रकरणामुळे सुपे यांचे निलंबन झाले आहे. तसेच अद्याप निकाल न लागल्याने राज्यभरातील भावी शिक्षकांना आपल्या निकालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षामध्ये (TET Exam) दलालांकडून अश्विनीकुमार याला पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. तर काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपये लाटले आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षामध्ये (TET Exam) दलालांकडून अश्विनीकुमार याला पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. डॉ. देशमुख आणि सावरीकर यांनी दलालांना पाच कोटी 37 लाख रुपये अश्विनीकुमार यांना देण्यास सांगितले, असे आता पुढे आले आहे.  

जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा तत्कालीन संचालक अश्विनीकुमार शिवकुमार याला पाच कोटी रुपये मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जी. ए. टेक्नॉलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्या दलालांना अश्विनीकुमारला पाच कोटी 37 लाख रुपये देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.