Discovery of a New Small Dragon: उद्धव ठाकरे यांचे थोरले पुत्र आदित्य हे अभ्यासू राजकारणासाठी ओळखले जातात. त्याप्रमाणे धाकडे पुत्र हे संशोधनासाठी ओळखले जातात. ठाकरे वाईल्डलाइफ संस्थेच्या अंतर्गत तेजस ठाकरे आणि टीम सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात जाऊन विविध प्राणी, प्रजातींची माहिती घेत असते. यात त्यांना विविध नव्या प्रजातींची माहिती मिळते. ठाकरे वाईल्डलाइफ फाउंडेशनने नुकताच एक रोमांचक शोध लावला आहे.
ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनने अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीच्या खोऱ्यातून नवीन लहान आकाराच्या ड्रॅगन सरड्याचा शोध लावला आहे. हा ड्रॅगन सरडा दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आढळणाऱ्या दैनंदिन अगामिड सरड्यांच्या गटातील कॅलोट्स या प्रजातीशी संबंधित आहे. या प्रजातीचे नाव "सिनिक" या नदीसाठी असलेल्या टॅगिन शब्दावरून ठेवण्यात आले आहे.
तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाच काम करणारी ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनची टीम हिमालयाच्या पर्वंतरांगांमधून वाहणार्या सुबानसिरी नदीच्या खोर्यात संशोधनाचे काम करतेय. येथे त्यांना सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लागलाय. तेजस ठाकरे आणि टीमने नव्याने शोधलेली प्रजाती समुद्रसपाटीपासून 1200 मी. उंचीवरील पर्वतांवरील जंगलांमधे आढळून आली आहे. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्षिल पटेल, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल तसेच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी बेंगलोर चे संशोधक चिंतन शेठ यांचा सहभाग आहे.
या प्रजातीचे नामकरण 'कॅलोटस सिनिक' असे करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशातील 'टॅगिन' जमातीचे लोक सुबानसिरी नदीला 'सिनिक' असं संबोधतात. त्यावरुन हे नाव देण्यात आले आहे. नव्याने शोधलेली सरड्याची प्रजाती सुबानसिरी नदीच्या खोर्यात सापडते म्हणून तिचे नामकरण 'कॅलोटस सिनिक' असे केल्याची माहिती देण्यात आली आहे.
आकार, अंगावरील खवल्यांची रचना, पोटावरील खवल्यांची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकिय संचावरुन ही प्रजाती कुळातील इतरांपेक्षा वेगळी ठरते. 'कॅलोटस' या कूळात समावेश करण्यात आलेल्या 'कॅलोटस सिनिक' आलेली सरड्याची ही प्रजाती दिनचर आहे. मुख्यत्वे ही प्रजाती झाडांवर वावरते. रात्रीच्या वेळी हे सरडे झाडांच्या छोट्या फांद्यावर किंवा खोडांवर विश्रांती घेतात. छोटे किटक हे त्यांचे मुख्य खाद्य असल्याची माहिती ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनकडून देण्यात आली आहे.