Viral Video : आईच्या कुशीत तान्हुला शांत झोपला असताना सापाने तिला विळखा घातला. आईने जीवाची पर्वा न करता मुलीचा जीव वाचविला. ही जळगावातील घटना ताजी असतानाच सोशल मीडियावर अजून एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Snake News) अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ निशब्द करुन सोडतो.
जंगल परिसर आणि शेताजवळील घरांमध्ये वनप्राण्यांचा कायम धोका असतो. त्यात पावसाळा आणि जमिनीची उष्णता वाढली की साप बिळातून बाहेर येतात. साप हा शब्द जरी ऐकला की हृदयाचे ठोके चुकतात. सापाच्या एका दंशाने आपण यमराजाकडे पोहोचतो. अशात एका भल्यामोठ्या नागाने झोपलेल्या बाळाला विळखा घातला. (viral Video News in Marathi)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हिरवगार शेतात घर आहे. तुम्ही नीट पाहलं तर व्हिडीओच्या सुरुवातीला घराच्या पायथ्याशी असलेल्या लाकड्याचा डोंगरच्या दिशेने एक मुंगूस धावत जाऊन हल्ला करतो. तिथे एक भल्यामोठ्या नाग लपलेला असतो. नाग आणि मुंगूसची लढाई होते. नागाने बचावासाठी मुंगूसवर हल्ला केल्यावर तो शेतात पळून गेला.
तिथे व्हरांड्यात दोरीला कापड्याच्या झोळीत तान्हुला झोपलेला असतो. मुंगूसापासून वाचण्यासाठी साप त्या झोक्यावर चढतो. ही भयानक घटना तिथे असलेल्या एकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. तर दुसऱ्याने लगेचच नागाचं हे कृत्य पाहतात हातात काठी घेतली. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ महाराष्ट्रातील कुठल्या तरी गावातील आहे. तान्हुल्याचा झोक्यावर तो नाग फणा काढून फणा काढून उभा राहतो. हा क्षण पाहून तान्हु्याच्या जीवाची काळजी वाटते. बराच वेळ तो नाग झोक्यालाच फणा काढून उभा असतो. हे दृश्य पाहून शेतात काम करणाऱ्या महिलाही श्वास रोखून उभा असतात. आईचा जीवही कासावीस होतो. (snake cobra fight mongoose After that snake attack slept baby Video viral on Social media Trending video marathi news maharashtra)
पुढे तुम्ही पाहू शकता झोक्याच्या शेजारी असलेल्या दारीवर काही कपडे सुकण्यासाठी टाकले असतात. झोक्याच्या दोरीला नागाने विळखा घातला होता. त्यानंतर शेजारील दोरीवरील बनियानच्या हातात नाग आपलं डोक अडकवतो आणि फणा काढून बराच वेळ तसाच राहतो. पुढे यातून सुटका करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नागाची झटपट दिसून येतं आहे.
सापाचा चिमुकल्यावर हल्ला पाहून व्हिडीओमध्ये लोकांची तांराबळ उडालायचा आवाज ऐकू येतं आहे.
एनसीसी त असताना कॅम्पला असताना टेन्ट मध्ये साप येऊ नये म्हणुन एक तंत्र शिकवलं होतं, त्यात तंबुच्या चारही बाजुने एक फुट रुंद एक फुट खोल असा सलग चौकोनी किंवा आयताकृती चर खोदावा, सापाची चाल हि त्याच्या मणक्यांच्या हालचालीवर अवलंबुन असते, या साईझचा चर त्याला त्यामुळे पार करता येत… pic.twitter.com/1VPaZBJGqb
— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) June 17, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरवर Dr prashant bhamare यांनी आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी सापापासून बचाव करण्यासाठी सल्ला दिला आहे.
पावसाळ्यात सापाचा धोका अधिक वाढतो अशावेळी काय काळजी घ्यावी हे त्यांनी या व्हिडीओसोबत सांगितले आहे.