परळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार

 शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला

Updated: Dec 12, 2020, 10:48 PM IST
 परळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार title=

बीड : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला. कापलेला केक घेण्य़ासाठी परळीकरांनी एकच गर्दी केली. केक घेण्य़ासाठी उपस्थितांमध्ये चढाओढ लागली होती. अवघ्या काही मिनिटांत ८० किलोचा केक गाय़ब झाला. केक घेण्यासाठीची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

'काँग्रेसनं पवारांना पंतप्रधान होण्यापासून रोखलं' - प्रफुल्ल पटेल

'काँग्रेसमुळे दोन वेळा पवारांचं पंतप्रधानपद हुकलं, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. 'काँग्रेसनं पवारांना पंतप्रधान होण्यापासून रोखलं' 'पवारांना डावलून नरसिंह रावांना पंतप्रधानपद दिलं' असे आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केलेत. पवारांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल पवारांनी लेख लिहिलाय. त्यामध्ये हा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय.