मुंबई, नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच - संजय राऊत

 मुंबई (Mumbai) आणि नाशिकचा (Nashik) आगामी महापौर (Mayor) शिवसेनेचाच ( Shiv Sena) असेल, असा विश्वास शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी येथे व्यक्त केला आहे.

Updated: Dec 12, 2020, 02:37 PM IST
मुंबई, नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच - संजय राऊत  title=
संग्रहित छाया

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने रचना करावी लागत आहे. बदल करावे लागणार आहेत. तर  मुंबई (Mumbai) आणि नाशिकचा (Nashik) आगामी महापौर (Mayor) शिवसेनेचाच ( Shiv Sena) असेल, असा विश्वास शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी येथे व्यक्त केला आहे.

नाशिक दौऱ्यावर राऊत आहेत. त्यावेळी त्यांनी भाष्य केले. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. ईडी, सिबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये.  केंद्राला हवे तसे या संस्था काम करतात, त्यामुळे ईडी, सीबीआयची प्रतिमा मालिन होत आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचा सन्मान राखून निवडणुका लढवू तर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचे महापौर निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. 

 देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले सध्या शरद पवार एकमेव नेते
 शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी याआधीच मिळायला हवी होती.
युपीएचं नेतृत्व कुणी करावं, यावर नेहमी चर्चा होत असते, मात्र निर्णय होत नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातला नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती होती. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. शेतकरी आंदोलन कुणीही हायजॅक केलेलं नाही, असे यावेळी राऊत म्हणाले.

ते शेतकऱ्यांचंच आंदोलन ते सर्व पंजाब, हरियाणाचे शेतकरी आहेत. तुम्ही कोणतीही हत्यारं वापरा, महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही. आम्ही लढणारे आहोत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने एक पाऊल मागे घेतल्यास सरकारने शरणागती पत्करली असं होत नाही. संविधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी तयार केलेलं नाही. कायदा बदलता येऊ शकतो. यावेळी भाजपवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे बांबू, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू शकलेलं नाही शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर देशाचे संरक्षण मंत्री का गप्प बसलेत, असा सवाल उपस्थित करत सरकार पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही, याचा पुनर्रउच्चार केला.