शेतक-यांच्या उभ्या पिकांमधून रिलायन्सची गॅस पाईपलाईन

रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये रिलायन्सची गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. त्याला शेतक-यांनी विरोध केला असतानाही, पोलीस बळाचा वापर करुन, पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुच आहे. 

Updated: Nov 21, 2017, 09:25 AM IST
शेतक-यांच्या उभ्या पिकांमधून रिलायन्सची गॅस पाईपलाईन title=

रायगड : रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये रिलायन्सची गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. त्याला शेतक-यांनी विरोध केला असतानाही, पोलीस बळाचा वापर करुन, पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुच आहे. 

विशेष म्हणजे खालापूर तालुक्यातल्या वनवाटे गावात शेतक-यांच्या उभ्या पिकांमधून ही गॅस पाईपलाईन नेली जात आहे. तर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदलाच अजूनपर्यंत रिलायन्सनं दिला नसल्याचा शेतक-यांचा आरोप आहे. त्यातच खालापूर पोलीस हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. या प्रकरणी या शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार सुरेश लाड आणि शिवसेना नेत्यांकडे दाद मागितली आहे.