Daund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ...

Pune Daund Crime News :  दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात  खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. 

Updated: Jan 25, 2023, 12:06 PM IST
Daund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ... title=
Pune-Crime

Pune Daund Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात  खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. (suicide update) त्याच प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मोहन पवार, संगिता पवार, मुलगी राणी आणि जावई त्यांची मुलीची 3 मुले यांचे मृतदेह नदीत सापडले होते. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. 

शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे. त्यावरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल दुपारी 1 वाजता यवत पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोइटे  यांनी दिली आहे.

दौंड (Daund) तालुक्यातील भीमा नदीत (Bima River) हे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. 18 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत भीमा नदीत मृतदेह सापडत होते.  त्यानंतर आता याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे.

भीमा नदीतील स्थानिक मच्छिमारांना 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर 20 जानेवारी रोजी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 21 जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखी एका पुरुषाचा मृतदेह मच्छिमारांना सापडला. पाच दिवसांत चार मृतदेह नदीत सापडल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नदीमध्ये सापडलेल्या मृतदेहांमुळे पोलीस खातेही संभ्रमात पडले होते. मात्र सखोल तपास करत पोलिसांनी याप्रकरणाचा शोध लागला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सापडलेले मृतदेह हे पती पत्नीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरु केली. यानंतर हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगी आणि जावई आणि त्यांची मुलं यांचे मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे याच कुटुंबातील आणखी तीन मुले बेपत्ता असल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. त्यांचेही मृतदेह सापडले.