Assembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल

Assembly By-Election : पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखात बदल करण्यात आलाय. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 

Updated: Jan 25, 2023, 11:06 AM IST
Assembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल title=
Maharashtra Assembly By-Election

Maharashtra Assembly By-Election : राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबतची सर्वात मोठी बातमी. (Assembly By-Election) एकीकडे उमेदवारीसाठी राजकीय रणकंदन सुरु असताना आता मतदानाची तारीखच बदलण्यात आली आहे.. कसबा (Kasba Peth) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad )  पोटनिवडणूक आता 26 फेब्रुवारीला होणार आहे (Maharashtra Political News) तर दोन्ही जागांची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. आधी हे मतदान 27 फेब्रुवारीला होणार होते. (Maharashtra News in Marathi)

 12 वीच्या परीक्षेमुळे तारखेत बदल

राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबरला निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे  आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारीला निधन झालं होतं. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.

पोटनिवडणूक लढण्याची राष्ट्रवादीची इच्छा

दरम्यान, कसबा आणि चिंचवड मतदारसंघातली पोटनिवडणूक लढण्याची राष्ट्रवादीची इच्छा आहे. या संदर्भात लवकरच काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. तसंच शिवसेनेनं मित्रपक्ष जोडल्यास त्यांना सहकार्यच केलं जाईल असंही पाटील म्हणाले. काल मातोश्रीवर अजित पवार आणि जयंत पाटील यांची उद्धव ठाकरेंशी प्रदीर्घ चर्चा झाली. शिवसेना आणि वंचित युतीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. 

पोटनिवडणुकीबाबत आज भाजपची महत्त्वाची बैठक

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीबाबत आज भाजपची महत्त्वाची बैठक आहे. त्यात उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. 

 तर दुसरीकडे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोटनिवडणुकीबाबत भाष्य केले आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. एकाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा सर्व सहकार्य करतात. सहकार्याचं उदाहरण आपण मुंबई पाहिले आहे, असे शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात आपली परंपरा राहिली आहे एखाद्या जागेवर एखाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा सगळेजण सहकार्य  करतात आणि ती निवडणूक बिनविरोध होते. दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत आहेत. चिंचवड पोटनिवडणूक लढण्यास शिवसेना इच्छूक आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. आज उद्या पुन्हा पोटनिवडणुकीवर मविआची बैठक होईल, असे राऊत म्हणाले. चिंचवड पोटनिवडणुकीवरुन शिवसेना - राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.