श्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री

Shrirampur Love Jihad Case:  मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. श्रीरामपूरमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Mar 20, 2023, 05:33 PM IST
श्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री

Shrirampur Love Jihad Case: अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर (Srirampur ) पुन्हा एकदा लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपांमुळे चर्चेत आले आहे. 14 वर्षीच्या अल्पवयीन मुलीची विक्री करून धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. ही मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे. प्रियकराच्या मदतीने आईनेच या मुलीची विक्री केल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे (Crime News).

श्रीरामपूर तालुक्यातील एका 14 वर्षीय मुलीची विक्री करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही मुलगी आठ महिन्यांची गर्भवती झाली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आठ वर्षापुर्वी मुलीच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नवाब लालाभाई शेख नावाच्या व्यक्तीने त्याचे अगोदर लग्न झालेले असतानाही बेकायदेशीर संसार थाटला. पिडीत मुलीच्या आईने आणि नवाब शेख यांनी या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विक्री केल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला आहे.

मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. श्रीरामपूरमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नवाब शेख आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या आणकी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मुलीची आई देखील यात आरोपी असून पोलीस तीचाही शोध घेत आहेत.

या अगोदरही श्रीरामपूर तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आमीष दाखवून, फुस लावून पळवून नेणे, अत्याचार करून वाममार्गाला लावणे, धर्मांतर करणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर शहरात मोठे रॅकेट कार्यरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर प्रकरणातील मुलीच्या आईलाही फुस लावून पळवून नेण्यात आले होते. यानंतर  तीच्याच मदतीने मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.