'आता न केलेल्या कामांचा पाढा वाचण्याची गरज'

सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात कामं खूप झाली आहेत. 

Updated: Sep 17, 2017, 10:39 PM IST
'आता न केलेल्या कामांचा पाढा वाचण्याची गरज' title=

नागपूर : सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात कामं खूप झाली आहेत. आता कोणती कामं झाली नाहीत याचा उलट पाढा वाचण्याची गरज, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

नागपूर शहर भाजप कार्यकारणी बैठकीत समारोप प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने सिंचनाचं प्रमाण २२ टक्क्यांवरुन दुप्पट करून ४० टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली म्हणून भाजप सत्तेत आल्यानं, विजयाचे खरे मानकरी भाजप कार्यकर्ते आणि जनता असल्याचं ते म्हणाले.