रत्नागिरी : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांना ३० कोटी रुपये खंडणीसाठी धमकी मिळाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने मिलिंद तुळसकर या आरोपीला रत्नागिरीतून अटक केली आहे. तो मुंब्र्याचा राहणारा आहे. कोविड-१९चे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये काम बंद झाले आणि हाताला काम नाही. त्यामुळे तो रत्नागिरीच्या घरी आला होता.
A Big Thank You to the @CPMumbaiPolice & The Anti-extortion cell for the swift action in getting the culprit in custody. Bravo @MumbaiPolice.
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) August 27, 2020
झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यानं दिग्दर्शक महेश मांजरेकरांना फोन करुन ३० कोटींची खंडणी मागितली. ही रक्कम हवालामार्फत द्यायली सांगितली. मात्र पोलिसांनी सापळा रचत मिलिंद तुळसकरला अटक केलीय. धक्कादायक म्हणजे आरोपीनं गूगलवरून माहिती घेत गँगस्टर कसे धमकी देतात याचा अभ्यास केला होता. मात्र पोलिसांनी या ओरीपाल आता बेड्या ठोकल्यात.
२६ ऑगस्ट रोजी महेश मांजरेकर यांना खंडणीचा कॉल आला होता. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी दादर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खंडणीविरोधी पथकाने तपासाला सुरूवात केली. अखेर पोलिसांनी मांजरेकर यांना फोन करणाऱ्याला अटक केली आहे.