Maharastra's First Double-Decker Bridge Over Vasai Creek : मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी अटल सेतू, कोस्टल रोड सारखे अनेक मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर, अनेक प्रकल्पांचे काम लवकरच सुरु होणार आहे. यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील दुसरा डबल डेकर पूल. वसईच्या खाडीवर महाराष्ट्रातील हा दुसरा डबल डेकर पूल उभारण्यात येत आहे. या पुलावर खाली वाहनांसाठी रस्ता असणार आहे. तर, वरच्या ब्रीजवरुन मेट्रो रेल्वे धावणार आहे. एमएमआरडीएकडून (Mumbai Metropolitan Region Development Authority) मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पहिला डबल डेकर ब्रीज हा नागपूरमध्ये आहे.
वसई- भाईंदर खाडीवर राज्यातील दुसरा डबल डेकर पूल बांधला जाणार आहे. एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वेचे ट्रॅक आणि खाली वाहनांसाठी पूल अशी रचना असेलला हा राज्यातील दुसरा पूल असणार आहे. यामुळे वसई शहराला मेट्रो कनेक्टीव्ही देखील मिळणार आहे. सध्या वसई ते भाईंदर असा प्रवास करायचा असेल तर बाय रोडच जावे लागते. मुंबई अहमदाबाद हायवे हा वसई आणि भाईंदरला जोडणारा एकमेव ऑप्शन आहे. यामुळे या प्रवासात बराच वेळ जातो. यामुळे या डबल डेकर ब्रीजमुळे वसई आणि भाईंदरला रस्ते आणि मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
MMRDA च्या माध्यमातूनच भाईंदर - नायगावच्या मध्ये हा डबल डेकर ब्रीज तयार करण्यात येणार आहे. हा ब्रीजवर एकूण 3 लेन असणार आहेत. या डबल डेकर ब्रीजची लांबी जवळपास 5 किमी असेल. तर, हा ब्रीज 30.60 m रुंद असेल. या डबल डेकर ब्रीजच्या वरच्या डेकवर मेट्रो रेल्वेचे ट्रॅक असणार आहेत. म्हणजेच वरच्या डेकवरुन मेट्रो रेल्वे धावणार आहे. तर, खालच्या डेकवर वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता असणार आहे. या डबल डेकर ब्रीजमुळे वसई विभागातील कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणार आहे.
महत्वाचे म्हणजे या ब्रीजमुळे वसई शहरामध्ये मेट्रोची कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. सरकारकडून मेट्रो 13 ची घोषणा करण्यात आली होती. या अंतगर्त मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रोमार्ग निर्माण केला जाणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 20 स्थानकांचा समावेश असेल. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतचा संरचनात्मक आराखडा तयार केला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी 9 जुलै 2024 रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आले आहे. लवकरच या डबल डेकर प्रकल्पाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.