Goa has two International Airports : महाराष्ट्र भारतातील सर्वात लोकप्रिय राज्य आहे. मुंबई शहर ही महाराष्ट्राची ओळख आहे. मुंबई शहर ही भारताची आर्थिक राजधानी आहे. यामुळे जगभरातून अनेक जण मुंबईत येतात. यासह महराष्ट्रातील अनेक शहरं देखील तितकीच लोकप्रिय आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात एकूण तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. मात्र, महाराष्ट्राला चिटकून असलेल्या भारतातील एका छोटाशा राज्यात 2 मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. जाणून घेऊया हे राज्य कोणते.
भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. महाराष्ट्रात एकूण तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई, भारतरत्न बाबासाहेब डॉ.बी.आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी यांची नावे आहेत. तर महाराष्ट्रात सात ते आठ डोमॅस्टिक एअरपोर्ट आहेत.
महाराष्ट्राला चिटकून असलेल्या भारतातील सर्वात लहान राज्याचे नाव आहे गोवा. गोव्यात 2 मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. दाबोलीम विमानतळ, दाबोलीम आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा अशी या विमानतळांची नावे आहेत.
दाबोलिम हे गोव्यातील पहिले विमानतळ आहे. 1955 मध्ये पोर्तुगीज प्रशासनाने हे विमातळ उभारले. 1961 मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलाने येथे आपला नौदल हवाई तळ उभारला. दाबोलिम विमानतळ वास्को द गामापासून 4 किमी अंतरावर. तर, गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरापासून हे विमानतळ 30 किमी अंतरावर आहे.
गोवा हे भारतातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील पर्यटक गोव्यात फिरायला येतात. यामुळे दाबोलिम विमानतळावरील होणारी गर्दी कमी करण्यासाछी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले. मनोहर विमानतळ हे मोपा विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. हे राजधानी शहरापासून 34 किलोमीटर अंतरावर आहे. 2022 मध्ये या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे इतर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 150 किमी अंतरावर आहे.
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे. हे विमानतळ सुमारे 5945 एकरवर बांधले आहे. तिरुचिरापल्ली येथे बांधलेले त्रिची विमानतळ हे भारतातील सर्वात लहान विमानतळ आहे.