Mere Husband Ki Biwi Set Accident : 'मेरे हस्बैंड की बीवी' या चित्रपटाच्या सेटवर नुकताच एक गंभीर अपघात झाला आहे. या गंभीर अपघातात भूमि पेडनेकर, अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानी वाचला. रॉयल पाल्म्स इंपीरियल पॅलेसमध्ये चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता. तर त्या सेटच छत ढासळलं. यावेळी अर्जुन कपूर, भूमि पेडनेकर आणि जॅकी भगनानी यांच्याशिवाय दिग्दर्शक मुदस्सर अजीज तिथे उपस्थित होते. दरम्यान, या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही आणि सगळे सुरक्षित आहेत.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे अशोक दुबेनं ईटाइम्सशी बोलताना सांगितलं की ही घटना शूटिंग दरम्यान, साउंड सिस्टममुळे होत असलेल्या व्हायब्रेशनमुळे झाली. अशोक दुबे म्हणाले 'गाण्याची शूटिंग रॉयल पाम्सच्या इंपीरियल पॅलेसच्या इंपीरियल पॅलेसमध्ये सुरु होची. तेव्हा लोकेशनचं छत ढासळलं, ज्यात अर्जुन कपूर, जॅक भगनानी आणि मुदस्सल अजीज यांना दुखापत झाली. ही लोकेशन बऱ्याच काळापासून तिथे आहे, त्यामुळे साउंड सिस्टमच्या आवाजानं होणारी व्हायब्रेशमुळे सेट हलू लागला होता. ज्यामुळे छत ढासळलं.'
कोरियोग्राफर विजय गांगुली जे चित्रपटातील गाण्यावर अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकरसोबत काम करत होते. त्यांनी शूटिंगच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'आम्ही एक गाणं शूट करत होतो आणि पहिला दिवस चांगला गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जवळपास 6 वाजता सगळं काही ठीक सुरु होतं आणि तेव्हाच आम्ही शॉट घेत होतो. आम्ही मॉनिटरजवळ होतो आणि तितक्याच छत ढासळलं. नशिबानं ते तुकड्यांमध्ये पडलं. त्यामुळे आमच्याकडे एक गड्ढा नुमा नावाचं एक ठीक होतं. जिथे लपून आम्ही स्वत: ला वाचवलं, पण तरी देखील अनेकांना दुखापत झाली.'
विजय गांगुलीनं पुढे सांगितलं की 'आजही शूटिंगसाठी या जुन्या लोकेशन्सची निवड करण्यात येते आणि प्रोडक्शन कंपनीचे असल्यानं आम्ही या सगळ्या गोष्टी तपासून घेतो की सगळ्या सुरक्षे संबंधीत असलेल्या गोष्टींचा तपास करण्यात यावा. पण अनेकदा, शूटिंगसाठी लोकेशन देण्यात येण्या आधी तपासलं जात नाही.'
हेही वाचा : 'डायमंड स्टडेड वॉच आणि...', असंवेदनशील प्रतिक्रियेनंतर उर्वशी रौतेला ट्रोल; माफी मागितली पण...
विजय गांगुलीनं सांगितलं की 'या घटनेत दिग्दर्शकाला दुखापत झाली. डीओपी मनु आनंदचा अंगठा फ्रॅक्चर झाला आणि स्वत: विजय गांगुलीच्या कोपर आणि डोक्याला दुखापत झाली. इतकंच नाही तर कॅमेरा अटेंडेटच्या मनक्याच्या हाडाला दुखापत झाली. चांगली गोष्ट ही आहे की कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.'