Maharashtra Political Crisis: शिवसेना आता कायद्याची लढाई लढायला तयार - संजय राऊत

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) आरोप केले आहेत.  

Updated: Jun 24, 2022, 10:44 AM IST
Maharashtra Political Crisis: शिवसेना आता कायद्याची लढाई लढायला तयार - संजय राऊत  title=

मुंबई : Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकावण्यात आले आहे, जी भाषा वापरली आहे ती आम्हाला मान्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना आता कायद्याची लढाई लढायला तयार आहे, असेही ते म्हणाले. 

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास शरद पवार यांना घरी जाऊ दिले जाणार नाही, असे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने ट्विट करुन म्हटले आहे. राऊत पुढे म्हणाले की, शरद पवारांबाबत अशी भाषा वापरणे मान्य नाही. संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार यांना एका केंद्रीय मंत्र्याकडून धमकावले जात आहे. अशा धमक्यांना मोदी आणि अमित शहा यांचा पाठिंबा आहे का? आम्ही (बंडखोर) आमदारांना अपात्र ठरवण्याची कारवाई करत आहोत.

शिवसेना आता कायद्याची लढाई लढायला तयार आहे. कायद्याची, कागदाची आणि रस्त्यावरची लढाई शिवसेनाच जिंकणार, असं संजय राऊत यांनी म्हटले. बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची कसोटी लागेल असं संजय राऊत यांनी सुनावलं. राज्यात केंद्रीय मंत्री पवारांना धमक्या देण्याचा माज दाखवतोय, हे मोदी शाहांना मान्य आहे का असा सवाल त्यांनी केलाय. 

राणेंनी काय केलेय ट्विट 

नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी दिली आहे. 'आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठीण होईल' असं राणे म्हणालेत. 'शरद पवार सर्वांना धमक्या देत आहेत' 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि मनाप्रमाणे मतदानही करणार आहेत, असं राणेंनी ट्विट केलंय. 

महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सुमारे 12 अपक्ष आणि लहान पक्षांव्यतिरिक्त 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. गुवाहाटी येथून प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या 'इशाऱ्या'वर सडकून टीका केली की, "आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आम्ही जे काही करत आहोत ते पूर्णपणे कायदेशीर आहे. आमच्याकडे सर्व आमदारांनी स्वेच्छेने सहभागी झाल्याची शपथपत्रे दिली आहेत. आमच्याकडे बहुमत आहे.