MPSC Exam | तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Updated: Jun 24, 2022, 10:35 AM IST
MPSC Exam | तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी title=

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे आयोगाच्या माध्यमातून 1994 नंतर पहिल्यांदाच दुय्यम निबंधक  या पदाची भरती केली जाणार आहे. सब रजिस्ट्रार या संवर्गाची 78 पदे भरली जाणार आहेत. 

या परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाच्या 42 जागा राज्य कर निरीक्षक पदाच्या 77 तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 603 जागा भरल्या जाणार आहेत.

परीक्षेसाठी राज्यातून लाखो विद्यार्थी बसत असतात. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.