कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! झाडं तोडण्यासंदर्भातील 'त्या' कायद्याला स्थगिती

कोकणात 1 झाड तोडलं तर 50 हजार रुपये दंड होत होता, यावर आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 17, 2024, 09:46 PM IST
कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! झाडं तोडण्यासंदर्भातील 'त्या' कायद्याला स्थगिती title=

कोकणच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोकणात 1 झाड तोडलं तर 50 हजार रुपये दंड होत होता, यावर आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.  तसं विधेयक आज मुख्यमंत्री यांनी पास केलं आहे. त्यामुळे अनेक कोकणी लोकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान उदय सामंत यांनी यावेली आम्ही नाराजांची समजूत काढू असं सांगितलं आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेट ही आपली संस्कृती आहे असं म्हटलं आहे. खातेवाटप लवकरच होईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 

कोकणातील वृक्षतोडीसंदर्भातील विधेयकावर ते म्हणाले की, "हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. परवानगी घेऊन झाडं तोडून उपजिविका करणारे जे शेतकरी, लोक आहे त्यांच्यावर फार मोठं संकट आलं होतं. मी यासंबंधी विधेयक मांडलं. मुख्यमंत्री त्यावेळी सभागृहात होते. त्यांनी सांगितलं की, हे 50 हजार दंडाचं जे विधायक आहे ते आम्ही स्थगित करत आहोत. हा दंड होणार नाही. भविष्यात हा दंड वाढवला पाहिजे हे निश्चित आहे. पण दंड वाढवताना तेथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन, चर्चा करुन, विचार विनिमय करुन हे विधेयक पुन्हा आणलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.