पोलिसाच्या घरात बिबट्या घुसला, बाथरुममध्ये लपला

हिंगणा परिसरातल्या पोलीस नगरातील पोलिसाच्याच घरात बिबट्य़ा घुसल्यानं मोठी खळबळ माजलीय.  

अमर काणे | Updated: Apr 15, 2018, 03:34 PM IST
पोलिसाच्या घरात बिबट्या घुसला, बाथरुममध्ये लपला  title=

नागपूर : हिंगणा परिसरातल्या पोलीस नगरातील पोलिसाच्याच घरात बिबट्य़ा घुसल्यानं मोठी खळबळ माजलीय. तब्बल नऊ तासांपासून हा बिबट्या घरात दडून बसलाय. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अधिका-यांना पाचारण करण्यात आलंय. मात्र बिबट्याला पकडण्यात यश आलेले नव्हते. पहाटे ए जी बायस्कर या पोलीस कर्मचा-याच्या घरातल्या बाथरूममध्ये बिबट्या दडून बसलेला आढळला.

बिबट्या घरात घुसल्याची बतामी परिसरात वा-यासारखी पसरली. त्यामुळं हजारोंच्या संख्येनं बघ्यांची गर्दी घराबाहेर जमली. दरम्यान, या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलेय. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रोखलेला श्वास सोडलाय.