सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2018, 12:24 PM IST
सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत title=

पुणे : महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं. याशिवाय ५०मीटर रायफल प्रोन प्रकारात तिनं रौप्यपदक पटकावण्याची किमया साधली होती.तिच्या या कामगिरीनंतर पुण्यात तिचं मोठ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.यावेळी महाराष्ट्राच्या सुवर्णकन्येचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुणेरी पगडी घालून तेजस्विनीची यावेळी मिरवणूक काढण्यात आली. आपल्या यशाचं श्रेय तेजस्विनीने यावेळी कुटुंबीय आणि गुरुंना दिलं. 

तेजस्विनीचे दुसरे पदक

नेमबाजीच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण तर अंजुन मुद्गीलला रौप्य पदक मिळालेय. ५० मीटरच्या रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताची तेजस्विनी सावंत, अंजुम मुद्गील अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यांनी आज चांगली कामगिरी करत पदकांची कमाई केली. तेजस्विनी सावंतचे हे दुसरे पदक आहे. त्याआधी तिने रौप्य पदक मिळवले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत तिचे दुसरे पदक असल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर या तिच्या गावी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी दोन पदकं, महाराष्ट्र कन्येला सुवर्ण