Pune Airport Viral Video : चीनमध्ये खेळवल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा (Asian Games 2023) रविवार म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात झाला. भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. दरम्यान या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये 107 पदकं जमा झाली. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. समारोपानंतर भारतीय खेळाडू मायदेशी आली आहेत. आशिया क्रिडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला कबड्डीपटूंनी दमदार कामगिरी केली अन् गोल्ड मेडल पटकावलं. या संघात पुण्याची कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिचा देखील समावेश होता. स्नेहल शिंदे जेव्हा पुण्यात आली तेव्हा तिचं दमदार स्वागत करण्यात आलं.
स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांनी मुलींच्या गळ्यातील मेडल पाहिलं अन् कष्टाचं फळ सार्थक झाल्याची भावना त्यांच्या मनात आली. मुलीला आनंदी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीला मिठी मारून ते ओक्साबोक्शी रडले. तिच्या गळ्यात विजयमाला घातली अन् शाब्बासकी दिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाली आहे.
Father of Kabaddi player Snehal Shinde, Pradeep Shinde gets emotional as the family receives her at the Pune Airport.
The Indian Women's Kabbadi team won the gold medal in the recently-concluded Asian Games.
pic.twitter.com/6v04SolEV7— Pune City Life (@PuneCityLife) October 11, 2023
एशियन्स गेम्समध्ये महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत भारताला चायनीज तैपेईकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. दोन्ही संघात काटे की टक्कर झाली. मात्र, शेवटी भारताने 26-25 गुणांसह सुवर्णपदक जिंकलं अन् पदकांच्या क्रमावारीत शतक ठोकलं. यामध्ये भारताच्या लेकींना देखील भारताची मान अभिमाने उंचावली. भारतीय महिला क्रिकेट आणि कबड्डी संघाने दमदार कामगिरी केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला कबड्डी संघाने जिंकलेलं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं. भारताने ग्वांगझू 2010 येथे सुवर्णपदक जिंकलं होतं, तर 2014 मध्ये इंचॉन येथे विजेतेपद पटकावलं होतं आणि जकार्ता 2018 येथे उपविजेतेपद पटकावलं होतं.