एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली जात होती.

Updated: Mar 3, 2021, 08:17 PM IST
एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय title=

मुंबई : राज्यात 8 मार्चपासून  सुरू होणाऱ्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. आता एमबीबीएसच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. विद्यार्थांना एमबीबीएसची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच द्यावी लागणार.  

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली जात होती. मात्र या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. तशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली आहे. 

याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांबरोबरच विद्यापीठाकडे अनेकांनी पत्रव्यवहार करत ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. मात्र इंटरनेटबरोबरच अनेक असे प्रश्न आहेत, ज्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नसल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.

परिणामी या परीक्षांविषयी स्पष्टता आल्यानंतर विद्यार्थी आता संबंधित परीक्षा केंद्रांवर परीक्षा देऊ शकणार आहेत.