कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पंचगंगा नदीची पाणी पातळी मंगळवारी 24 फुट इतकी होती.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्यामुळं पंचगंगा नदीची राजाराम बंधा-यावरील पाणी पातळी 30 फुटावर जाऊन पोहचली आहे. मधल्या काळात पावसानं उघडीप दिली होती. पण आता पाऊस पुन्हा एकदा जोरत सुरु झाल्यानं धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झालीय. राधानगरी धरण 100 टक्के भरलंय. तुळशी धरण 99.62 टक्के तर वारणा धरण 100 टक्के भरलंय.