हा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

Updated: Sep 20, 2017, 06:24 PM IST
हा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक  title=

ठाणे : दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ठाण्यात बिल्डरला धमकावणे आणि फ्लॅटच्या स्वरूपात खंडणी घेतल्याता इक्बाल कासकरवर आरोप आहे.

ठाण्यातल्या घोडबंदर परिसरातील निवो पॅलेस या इमारतीत चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ४०५ मध्ये इक्बालचा साथीदार मुमताझ अझीझ शेख राहतो. हा फ्लॅट खंडणी स्वरूपात घेण्यात आल्याचा दावा पोलिसांचा आहे. असे अजून तीन फ्लॅट खंडणी स्वरूपात घेऊन विकण्यात आलेत अशी सूत्रांची माहिती आहे. याच फ्लॅटमधून ठाण्यातील खंडणी मागण्याचे प्रकार सुरू होते. 

याच फ्लॅटप्रकरणी इकबाल कासकरला अटक