कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी भाजपाला घेरण्याची तयारी

शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. 

Updated: Jul 10, 2017, 06:44 PM IST
कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी भाजपाला घेरण्याची तयारी title=

पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय.

शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर शिवसेनेकडून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येतंय. पुण्यातही जिल्हा बँकेपुढे अशाप्रकारे आंदोलन करुन कर्जमाफीच्या तात्काळ अंमलबजावणीची मागणी करण्यात आलीय. 

तसंच कर्जमाफी योजनते पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेनं प्रसिद्ध करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हा बँकेनं पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध करावी असं निवेदन यावेळी देण्यात आलं.

राज्य सरकारनच्या सुरुवातीच्या निकषानुसार फक्त पाच टक्के शेतकरी पात्र होत होते. निकष बदल्यानंतर देखील 15 ते 20 टक्केच शेतकरी पात्र ठरत आहेत. अशी माहिती बँकेचे अध्यक्षांनी दिली आहे.