Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar: विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. यावरुन महायुतीवर निशाणाल साधलाय. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कोपर्डी दुर्घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना आवाहन केले.
शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे एकु नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले. पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे असेही ते म्हणाले. पवार साहेबांनी जनतेचे मत स्वीकारले पाहिजे.लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवारांनी करू नये, असेही फडणवीस पुढे म्हणाले.
शरद पवार हे 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. अशा परिस्थीत संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो, असेही ते पुढे म्हणाले. जवळच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली ते असे वागत असतील पण पराभव का झाले ते त्यांना मनातून माहिती असल्याचे फडणवीस पुढे म्हणाले.
मोठी राज्य आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्य आहेत तिथे आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटतं. अजित दादा गटाची मत 58 लाख मत असून त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. काँग्रेसला 80 लाख मत असताना त्यांचे 15 जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. यानंतर आज पुन्हा पवारांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधला. "काल ईव्हीएमसंदर्भात मी बोललो तर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. पवार साहेबांनी ही करणं देणं योग्य नाहीत. काय चुकीचं केलं मी? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे का? काही पद्धती बद्दल लोकांच्या मनात शंका आली त्याची माहिती घेऊन निरसन करण्याबद्दलचे काळजी घेणं चूक आहे का?" असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. "मुख्यमंत्र्यांना विनंती आम्हाला यात राजकारण आणायचं नाही इथे जे घडलं ते माहिती घेणे त्यांची शंका दूर करणे काम आहे. यात कसलंही राजकारण करायचं नाही," अस शरद पवार मारकडवाडीकरांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले होते.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. 2024 लोकसभेत भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13 होत्या. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा होत्या. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी पवारांना केले.