प्रताप नाईक / कोल्हापूर : Husband killed his wife and two children in Kolhapur : महाराष्ट्र तिहेरी हत्याकांडाने हादरला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये हे तिहेरी हत्याकांड घडले. पतीने रागाच्या भरात पत्नी, मुलगा आणि मुलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या हत्याकांडानंतर जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सगळ्यात धक्कादायकदायक म्हणजे मी बायको आणि दोन पोरांना संपवले आहे, मला अटक घ्या, असे म्हणत संशयित आरोपी प्रकाश माळी हा पोलिसात स्वत: हजर झालाय. या हत्याकांडामुळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कागलमधील काळम्मावाडी वसाहत आधील तापी घरकुलमध्ये संशयित आरोपी प्रकाश बाळासाहेब माळी ( 42 ) हा आपल्या कुटूंबा सोबत राहात होता. काल दुपारी त्याची पत्नी गायत्री ( 30 ) फोनवर बोलत होती. त्यावेळी प्रकाश आणि त्याची पत्नी गायत्रीमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रकाशने पत्नी गायत्रीचा गळा आवळून खून केला. गायत्रीचा मृतदेह आतील खोलीत ठेवला. सायंकाळी साडेपाच वाजता दहा वर्षांचा मुलगा घरी आला, त्याने बाबा असं का केलात, असा प्रश्न विचारताच त्याचाही दोरीने गळा आवळून खून केला. त्यांनतर आठच्या सुमारास सोळा वर्षांची मुलगी घरी आली. तिने आई आणि भावाचा मृतदेह पहिल्यानंतर हंबरडा फोडला. त्यावेळी आरोपी प्रकाशने थेट तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला.
पण आदितीने जोरचा हिसका मारून पळ काढायचा प्रयत्न केला. तेव्हा वडील प्रकाशने तिच्या डोक्यात वरवंटा घालून तिचाही खून केला. त्यांनतर तो भावाच्या घरी जावून मी बायका पोरांना संपविले, अस सांगितले. पण भावाला प्रकाश मस्करी करतोय, असे वाटले. त्यामुळे प्रकाश थेट कागल पोलीस स्टेशन गाठून जाऊन "मी बायका आणि पोराचा खून केलाय, असे सांगू लागला. कागल पोलिसानी सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही, पण नंतर मात्र ताब्यात घेवून चौकशी केली. त्यावेळी तिहेरी हत्याकांड समोर आले. या घटनेची कागल पोलीस अधिक तपास करत आहेत.
दुपारी दोन वाजता बायकोचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पाच वाजता मुलगा घरी आला त्यालाही मारले. आठच्या सुमारास मुलगी घरी ओरडू लागली म्हणून तिच्या डोक्यात वरवंटा घातला. तिचाही खून केल्याचे निर्विकार चेहऱ्याने संशयित आरोपी प्रकाशने कागल पोलिसांना सांगितले. या दरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चातापाचा लवलेश नव्हता.